परतावा व पेमेंट मदत धोरण (Refund Policy)
अद्ययावत दिनांक: ११ नोव्हेंबर २०२६ | महसूल्गुरू (drdcsanjayk.info)
१. डिजिटल ई-पुस्तक खरेदी धोरण
महसूल्गुरू संकेतस्थळावर उपलब्ध असलेली सर्व उत्पादने ही तात्काळ डाऊनलोड होणारी डिजिटल PDF ई-पुस्तके आहेत. एकदा पेमेंट पूर्ण होऊन डाऊनलोडची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर डिजिटल उत्पादन परत करता येत नसल्याने सामान्यतः रक्कम परत (Refund) केली जात नाही. खरेदीपूर्वी कृपया उपलब्ध असल्यास मोफत नमुना वाचन (Preview) अवश्य पहावे.
२. खालील अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण मदत / परतावा दिला जातो:
- दुहेरी पेमेंट (Double Payment): तांत्रिक कारणामुळे एकाच पुस्तकाचे किंवा VIP पासचे पैसे खात्यातून दोनदा वजा झाल्यास अतिरिक्त रक्कम ५ ते ७ कामकाजाच्या दिवसांत मूळ खात्यावर परत केली जाईल.
- पेमेंट वजा झाले पण डाऊनलोड अॅक्सेस न मिळाल्यास: तांत्रिक अडचणीमुळे पैसे कट होऊन पुस्तक न उघडल्यास, पेमेंट स्क्रीनशॉट व नोंदणीकृत ईमेल/मोबाईल क्रमांकासह WhatsApp किंवा संपर्क पेजवर कळवावे; आमची टीम २४ तासांत पुस्तक अॅक्सेस सुरू करून देईल किंवा योग्य परतावा करेल.
३. तक्रार निवारणासाठी संपर्क
पेमेंटशी संबंधित कोणत्याही मदतीसाठी संपर्क पेज वरून अथवा अधिकृत WhatsApp क्रमांकावर व्यवहार क्रमांक (Transaction ID) पाठवावा.