👑 खास VIP आजीवन सदस्यत्व: डॉ. संजय कुंडेटकर सरांची सर्व ई-पुस्तके व नवीन आवृत्त्या मोफत मिळवा! योजना पहा ➔

वाचक मदत केंद्र व नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

१. पुस्तक निवडा व खरेदी करा

पुस्तक अनुक्रमणिका किंवा कॅटलॉगमधून हवे ते ई-पुस्तक निवडून खरेदी करा बटण दाबा.

२. सुरक्षित UPI / कार्ड पेमेंट

Google Pay, PhonePe, Paytm किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट पूर्ण करा. पेमेंट होताच तुमचा Purchases विभाग उघडतो.

३. अधिकृत PDF डाऊनलोड

तुमच्या नावाची अधिकृत पर्सनलाइज्ड वॉटरमार्क केलेली PDF प्रत तात्काळ मोबाईल किंवा संगणकावर सेव्ह करा.

PDF कॉपीराइट व वैयक्तिक वॉटरमार्क सूचना

प्रत्येक सशुल्क व VIP डाऊनलोड होणाऱ्या ई-पुस्तकावर खरेदीदाराचे नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल आणि युनिक खरेदी कोड वॉटरमार्क स्वरूपात छापलेला असतो. ही फाईल केवळ वैयक्तिक वाचनासाठी असून तिचे WhatsApp, Telegram किंवा कोणत्याही माध्यमातून पुनर्वितरण करणे भारतीय कॉपीराइट कायदा, १९५७ नुसार कायदेशीर गुन्हा आहे.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

मामलतदार न्यायालय अधिनियम १९०६ च्या कलम ५(२) नुसार संबंधित तहसीलदारांकडे अर्ज करता येतो. तहसीलदार प्रत्यक्ष स्थळपाहणी (पंचनामा) करून वहिवाट रस्ता तात्काळ मोकळा करण्याचे आदेश देऊ शकतात. तसेच रस्ता अडवणाऱ्यावर कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. याबाबतचे सविस्तर नियम आमच्या "वहिवाट रस्ता वाद व उपाय" या पुस्तकात दिलेले आहेत.

हिंदू वारसा (सुधारणा) कायदा २००५ नुसार ९ सप्टेंबर २००५ पासून मुलींनाही मुलांइतकाच जन्मतः समान हक्क आहे. लग्न कधीही झालेले असले तरी वडिलोपार्जित मिळकतीत मुलगी समान सहहिस्सेदार (Coparcener) मानली जाते. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा विनीता शर्मा निकाल अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार फेरफार नोंदीवर कोणतीही हरकत नसल्यास ती ठराविक मुदतीत प्रमाणित करावी लागते. मंडळ अधिकाऱ्याने ती विनाकारण प्रलंबित ठेवल्यास आपण संबंधित उपविभागीय अधिकारी (SDO) किंवा तहसीलदारांकडे तक्रार व फेरफार प्रमाणिकरणासाठी दाद मागू शकता.

पेमेंट यशस्वी होताच स्क्रीनवर "डाउनलोड करा" चे हिरवे बटण तात्काळ उपलब्ध होते. तसेच आपल्या खात्यामध्ये (डॅशबोर्ड) हे पुस्तक कायमस्वरूपी जतन राहते, जिथून आपण ते कधीही पुन्हा डाऊनलोड करू शकता. शिवाय आपल्या व्हॉट्सॲपवरही डाऊनलोड लिंक पाठवली जाते.

VIP सदस्यांना डॉ. संजय कुंडेटकर सरांची सध्याची सर्व ६१+ अद्ययावत ई-पुस्तके तात्काळ मोफत मिळतात, तसेच भविष्यात प्रकाशित होणारी सर्व नवीन पुस्तके व सुधारित आवृत्त्या आयुष्यभर कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय मोफत मिळतात.

बँकेचे संपूर्ण कर्ज फेडल्यानंतर बँकेकडून "ना-हरकत दाखला" (NOC) व बोजा कमी करण्याचे पत्र मिळते. ते पत्र तलाठ्याकडे सादर करून गाव नमुना ६ मध्ये बोजा कमी करण्याचा फेरफार घेतला जातो व मंडळ अधिकाऱ्यांच्या सहीने सातबाऱ्यावरील इतर हक्कातील नोंद रद्द होते.

अजूनही काही अडचण आहे का?

आमच्या टीमशी थेट संपर्क साधा किंवा WhatsApp वर मेसेज करा.

WhatsApp वर मदत
MahsulGuru App
महसूल गुरू ॲप
फोनवर थेट ॲपप्रमाणे उघडा

We use cookies to personalize your experience. By continuing to visit this website you agree to our use of cookies

More